Breaking News

जामनेर-पहूर रोडवरील तिहेरी अपघातात दोघांचा मृत्यू, 8 जण जखमी……

जामनेर पहूर रोडवर अपघाताची मालिका सुरू आहे. गुरुवारी झालेल्या तिहेरी अपघातात बाबुराव पावरा व त्यांच्या पत्नीचा जागीचमृत्यूझाला आहे. या अपघातात त्यांची मुलगी गंभीर जखमी असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे प्राथमिक उपचार करून जळगाव येथे हलविण्यात आले आहे. यारस्त्यावरील हा दीड महिन्यातील तिसरा अपघात आहे.गुरुवारी (6 जून) सकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास आयशर गाडीने समोरील चालणाऱ्या दुचाकीला चिरडून समोरून येणाऱ्या रिक्षाला चिरडले आहे. यात बाबुराव पावरा व त्यांची पत्नी दुचाकीवर होते. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पाच वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. तर रिक्षात बसलेले चार ते पाच प्रवाशी जखमी झाले आहे. यात बिलकेस चौधरी, रज्जाक चौधरी,रोहन चौधरी, सोहल चौधरी, रुकसार चौधरी, सबेरा चौधरी, व सुशिल काटकर हे जखमी झाले असून यात त्या चिमुरीचा समावेश आहे यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Tags

Related Articles

Back to top button
Close