Breaking News

बारावीचा राज्याचा निकाल 85.88 टक्के, यंदाही मुलींची बाजी….

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 85.88 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.53 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. यंदाही मुलींची बाजी निकालाच्या बाबतीत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 90.25 टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल 82.40 टक्के आहे. यावर्षी विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 7.85 टक्क्यांनी जास्त आहे. संपूर्ण राज्यात 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. मुंबईच्या सोफिया कॉलेजची विद्यार्थिनी निशीका ही iPad वर परीक्षा देणारी पहिलीच दिव्यांग विद्यार्थिनी ठरली होती. ती 73 टक्क्यांनी उत्तीर्ण झाली आहे. बारावीचा विभागनिहाय निकाल: ▪ पुणे - 87.88 टक्के ▪ मुंबई - 83.85 टक्के ▪ नागपूर - 82.81 टक्के ▪ अमरावती - 87 टक्के ▪ लातूर - 86.08 टक्के ▪ नाशिक - 84.77 टक्के ▪ औरंगाबाद - 87.29 टक्के ▪ कोल्हापूर - 87.12 टक्के ▪ कोकण - 93.23 टक्के शाखानिहाय निकाल ▪ कला - 76.45 टक्के ▪ वाणिज्य - 88.28 टक्के ▪ *विज्ञान - 92.60 टक्के

Tags

Related Articles

Back to top button
Close