Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
ठाणे

मीरा भाईंदर आर्टस् फेस्टिव्हल 2019 चा जल्लोषात शुभारंभ….

विविध प्रकारच्या कला, आपली संस्कृती याचा जागर करण्यासाठी कलाप्रेमींना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि मीरा भाईंदर शहरात कला - संस्कृतीचे वातावरण अधिक वाढावे म्हणून गेल्या वर्षीपासून कला - संस्कृती प्रेमी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून 'प्रताप सरनाईक फाउंडेशन' तर्फे 'मीरा भाईंदर आर्ट्स फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. मीरा भाईंदर मध्ये हे आर्ट्स फेस्टिव्हल असंख्य मीरा भाईंदरकरांसाठी आयोजित करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचे उद्धाटन महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य फेस्टिव्हलचे आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वागत केले. यावेळी आमदार नरेंद्र मेहता, युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक उपस्थित होते. फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी पार्थिव गोहिल यांच्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. हजारो कालाप्रेमींनी, रसिकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. बाळासाहेब ठाकरे मैदान, इंद्रलोक, भाईंदर पूर्व येथे हे फेस्टिव्हल सुरू झाले आहे. आयोजक प्रताप सरनाईक म्हणाले की, या फेस्टिव्हलला मिळणारा प्रतिसाद व कला रसिकांची होत असलेली गर्दी पाहून मीरा भाईंदरकर कलेवर किती प्रेम करतात हे पाहून मला खूप आनंद झाला. कलाकार व कलाप्रेमींना व्यासपीठ मिळावे म्हणून मीरा भाईंदर शहरात असेच विविध कार्यक्रम मी आयोजित करणार आहे, तसेच मीरा भाईंदर मध्ये कला दालन मार्गी लावणार आहे असे सरनाईक यांनी सांगितले. महापौर डिंपल मेहता म्हणाल्या की, कलाप्रेमी आमदार प्रताप सरनाईक यांचे मी खूप आभार मानते कि त्यांनी मिरा भाईंदरच्या जनतेला फेस्टिव्हल च्या रूपाने इतकी चांगली पर्वणी प्राप्त करून दिली व असे भव्य फेस्टिव्हल येथे सुरू केले. कलाकारांना एक मोठे व्यासपीठ सरनाईक यांनी निर्माण करून दिले आहे असे उद्गार त्यांनी काढले. मीरा भाईंदर भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता म्हणाले की, कलेला व कलाकारांना वाव देण्यासाठी इतके भव्य फेस्टिव्हल आपल्या शहरात आमदार प्रताप सरनाईक करीत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याशिवाय या फेस्टिवलमध्ये दिग्गज कलाकार येऊन कला सादर करतात ही फार मोठी गोष्ट आहे. स्थानिक कलाकार, कलाप्रेमी यांच्यासाठी सरनाईक यांनी मोठे व्यासपीठ दिले आहे असे सांगत फेस्टिवलचे आयोजक प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईकांचे मेहता यांनी अभिनंदन केले. प्रताप सरनाईक हे कला व संस्कृती प्रेमी असून मीरा भाईंदरमध्ये आर्ट गॅलरी बनवायचा त्यांचा मानस स्तुत्य आहे असेही मेहता म्हणाले. कलेचे वातावरण, लोकांचा प्रतिसाद एकूणच फेस्टिव्हलचे वातावरण अत्यंत जबरदस्त होते अशी प्रतिक्रिया आलेल्या नागरिकांनी दिली. फेस्टिवलच्या उदघाटनाला नाशिक ढोल वादन झाले. कार्यक्रमात कलेची पर्वणी आहे. चित्र प्रदर्शनात सुंदर लक्षवेधी चित्रे, विशेषतः थ्रीडी चित्र लोकाना आवडली. (painting's 3d) त्यात शिवशंकराचे आणि नरेंद्र मोदींचे चित्र सगळ्यांची दाद मिळवून गेले. वाचकांसाठी पुस्तकांचे कक्ष, लहान मुलांना खेळण्यासाठी गेम झोन तसेच इतर खेळ फेस्टिव्हलमध्ये आहे. नगरसेविका परीष सरनाईक यांच्यासह शिवसेना भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Related Articles

Close