Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
ठाणे

२५ ते २८ मे दरम्यान आर्ट फेस्टिव्हल….

मीरा भाईंदर आर्ट फेस्टिव्हल २५ ते २८ मे दरम्यान भाईंदरला होणार आहे. प्रताप सरनाईक फाऊंडेशनच्या वतीने गेल्या वर्षीपासून हा फेस्टिवल होत आहे. विविध प्रकारच्या कला व संस्कृतीचा जागर करण्यासाठी, कला प्रेमींना एक व्यासपीठ मिळावे तसेच शहरात कला - संस्कृतीचे वातावरण अधिक वाढावे, म्हणून सरनाईक यांच्या संकल्पनेतून हा फेस्टिवल सुरु करण्यात आला. गेल्या वर्षी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळला होता. यंदाही कार्यक्रमांची रेलचेल असून हिंदी हास्य कवी संमेलनात सुरेंद्र शर्मा, जॉनी बैरागी, मुन्ना बॅटरी, सुमिता केशवा व महेश दुबे सहभागी होणार आहेत. तसेच या फेस्टिवलमध्ये ' जेष्ठ नागरिक विरंगुळा संस्था ' भाईंदर (पू ) ने घेतलेल्या एकांकिका स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्या आणि दोन उत्तेजनार्थ नाट्य संस्थांचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि. २८ मे रोजी आ. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे.

Related Articles

Close