Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
ठाणे

ठाण्यातील १७ व्या शतकातील तोफा घेणार मोकळा श्वास…..

खाडी आणि समोरच्या तिरावर दिसणारा डोंगर असा निसर्गाचा नजराण्या सोबत लढाईसाठी तैनात ठेवलेल्या तोफा बघायला मिळाल्या तर...ऐतिहासिक वस्तू बघितल्या नंतर लगेचच मनाच्या कंगो-यात दडून बसलेला इतिहास ताजा होतो त्यामुळे एक प्रेरणास्थान ठरणा-या या ऐतिहासिक वस्तू जतन करण्याचा मोह अनेकांना होतो. परंतु तरी चक्क तीनशे वर्षांपूर्वी कोपरीतील विसर्जन घाटावर उलट्या गाडून ठेवलेल्या तोफा मोकळा श्वास घेणार आहेत. ठाणे शहरातील भूईकोट किल्लाच्या (आत्ताचे सेंट्रल जेल) सुरक्षेसाठी पोर्तुगीज बनावटीच्या तोफा काढून ऐतिहासिक तोफांचे लवकरच संवर्धन होणार असून पर्यटकांना पाहण्यासाठी त्या दर्शनी भागावर ठेवण्यात येणार आहेत. पुरातत्व विभाग, ठाणे महानगर पालिका, मेरिटाईम बोर्ड आणि दुर्गवीर प्रतिष्ठानने या कामासाठी पुढाकार घेतला आहे. खाडी किनारी मातीमध्ये उलट्या गडण्यात आलेल्या तोफा आता लवकरच जमिनीवर मांडण्यात येणार असल्याने मोकळा श्वास घेणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गड संवर्धन समितीच्या कायकर्ते शनिवार आणि रविवार दोन दिवस परिश्रम काढून या तोफा काढणार असून सुरुवातीला 13 तोफा पैकी 6 तोफा काढून त्या सुशोभित करण्यात येणार आहे.

Related Articles

Close