Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
पुणे

बारामतीतील विजयानंतर सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया….

बारामतीतून सुप्रिया सुळे यांनी जवळपास दीड लाख मतांची आघाडी घेत भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर सुप्रिया सुळेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बारामती, 24 मे २०१९ : - लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे बारामती राखणार का ? त्यांचं मताधिक्य वाढणार की घटणार ? असे प्रश्न विचारले जात होते. बारामतीतून सुप्रिया सुळे यांनी जवळपास दीड लाख मतांची आघाडी घेत भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर सुप्रिया सुळेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ' श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी', असे भावूक ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. या निवडणुकीत भाजपकडून बारामती सतत आव्हान देण्यात येत होतं. या पार्श्वभूमीवर मिळवलेल्या विजयानंतर सुप्रिया सुळेंनी या भावना व्यक्त केल्या.

Related Articles

Close