Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
ठाणे

वज्रेश्वरी मंदिरावर दरोडा टाकून लाखो रुपयांची चोरी करणारे दरोडेखोर गजाआड….

काही दिवसांपूर्वी अज्ञात दरोडेखोरांनी वज्रेश्वरी मंदिरावर दरोडा टाकून मंदिरातील दानपेट्या फोडून लाखो रुपयांची चोरी केली होती. या प्रकरणी आता त्या दरोडेखोरांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे तर यातील तीन आरोपी फरार आहेत. दरम्यान अटक आरोपींकडून २,८३,०३६ /- रु. रोख रक्कम तसेच गुन्हा करण्यासाठी वापलेल्या दोन मोटार सायकल ३,८३,०३६ /- रु. असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोविंद सोमा गिंभल, विनीत सुरजी चिमडा, भारत लक्ष्मण वाघ, जगदीश काशिनाथ नावतरे, प्रवीण काशिनाथ नावतरे अशी या दरोडेखोरांची नावे असून त्यांना दादरा नगर हवेली, जव्हार आणि शहापूर येथून अटक करण्यात आली आहे. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न इ. गंभीर गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Related Articles

Close