Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
मनोरंजन

महाकवी कालिदास कवीकट्टा साहित्य मंडळ आयोजित कवी संमेलन संपन्न…..

बुद्धापोर्णिमेचे औचित्य साधून महाकवी कालिदास कवीकट्टा साहित्य मंडळाच्या वतीने बहुभाषिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी धुळे शहर परिसरातील अनेक कवींनी हजेरी लावून आपल्या कविता सादर केल्या. जेष्ठ साहित्यीक विजयचंद्र जाधव यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. प्राचार्य क ऊ संघवी, सुभाष आहिरे, मंगला रोकडे, प्रकाश ठोंबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष मुरलीधर पांडे यांनी प्रास्ताविकात महाकवी कालिदास यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. बुद्धाच्या कार्याची माहिती विशद करून कवी संमेलन भरवण्याचा हेतू प्रकट केला कवी संमेलनाची सुरुवात प्रकाश ठोंबरे यांच्या माझी कविता द्वारे झाली. मंगला रोकडे हिंदीत लिली, विश्वनाथ सोनार हिन्दीत अच्छे बच्चे, भास्कर अमृतसागर विश्व झुकले रे पाहुनी गौतमाला, अशोक शिरसाठ भीमराया कशी रे तुझी छाया, भगवान अहिरे तरवाडे बुद्ध जाणीला कोणी, विजया भट ज्ञानप्राप्ती अशा प्रकारे बुद्धावर कविता सादर करण्यात आल्या. प्रभाकर कासार नायक हे राजकीय विडंबन, पापलाल पवार यांनी कामगारांचे प्रश्न, मंगला राजपूत पाण्याची महती, जेष्ठ साहित्यीक सुभाष आहिरे मृत्यूगान गावचे, मुरलीधर पांडे शेवटी हिंदीत मेरी 'किताबोंसे जंग ठन गयी ही कविता सादर केली. विजयचंद्र जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भगवान बुद्धाची महानता, त्यांचा संदेश, बौद्ध तत्वज्ञानाचे सर अशी अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मुरलीधर पांडे यांनी केले.

Related Articles

Close