Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
मुंबई

मतमोजणी करीता केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती…..

मुंबई शहर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या ३१ मुंबई दक्षिण व ३० मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी करीता केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ मुंबई दक्षिण मतदारसंघाच्या मतमोजणी करीता केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नेमणूक झाली असून रविंद्रकुमार चौधा हे १८२ - वरळी व १८३ - शिवडी या दोन विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक आहेत तर भारती ओग्रे या १८४ - भायखळा व १८५ - मलबार हिल या मतदारसंघा करीता आणि रेणुका श्रीवास्तव १८६ - मुंबादेवी व १८७ - कुलाबा या मतदारसंघा करीता मतमोजणी निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तसेच ३० मुंबई दक्षिण मध्य करीता केंद्रीय निवडणूक निरीक्षक बिश्वनाथ सिन्हा हे १८० - वडाळा व १८१ - माहिम या दोन विधानसभा मतदारसंघाचे निरक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तर समीर कुमार भट्टाचार्य हे १७८ - धारावी व १७९ - सायन मतदारसंघ आणि एस के मिश्रा १७२ - अणुशक्तीनगर व १७३ - चेंबुर याकरीता मतमोजणी निरीक्षक आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी आणि शहाजी पवार यांनी दिली आहे.

Related Articles

Close