Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
मनोरंजन

‘त्या’ वादग्रस्त ट्विटबद्दल विवेक ओबोरॉयने मागितली माफी…….

अभिनेता विवेक ओबोरॉयने एक्झिट पोलवरुन अभिनेत्री ऐश्वर्या राय - बच्चनवरील आक्षेपार्ह मीम ट्विटरवर पोस्ट केले होते. मात्र यामुळे तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने आता विवेक ओबोरॉयने याप्रकरणी दोनवेळा ट्विट करत माफी मागून पोस्ट करण्यात आलेले आक्षेपार्ह मीमचे ट्विट सुद्धा डिलीट केले आहे. याबाबत त्याने पहिल्या ट्विटमध्ये असे म्हंटले आहे की, 'कधी-कधी कोणाला पहिल्यांदा जे मजेशीर आणि निरपराध वाटते. ते दुसऱ्यांना बहुतेक वाटत नाही. मी गेली दहा वर्षे 2000 हून अधिक असहाय्य मुलींच्या सशक्तिकरणासाठी घालविली आहेत. मी कधीही कोणत्याही महिलेचा अपमान करण्या संदर्भात विचार करु शकत नाही. त्यानंतर, दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने 'जर मीमला दिलेल्या रिप्लायवरुन एकाही महिलेला ठेच पोहचली असेल, तर यामध्ये सुधारणा गरजेची आहे. माफी मागतो. ट्विट डिलीट केले आहे. असे म्हंटले आहे.

Related Articles

Close