Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
पुणे

वाहतूक नियमांचा भंग करणा-या दुचाकी स्वारकाकडून चक्क १२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल…..

वाहतूक नियमांचा भंग करणा-या एका दुचाकी चालकाकडून पुणे वाहतूक विभागाच्या वतीने चक्क १२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हेल्मेट परिधान न केल्यामुळे त्याला हा दंड करण्यात आला असून या दुचाकी स्वाराने तब्बल २५ वेळा हेल्मेटसक्तीच्या नियमाचे उल्लंघन केले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या स्वरुपातील दंड भरल्यानंतर संबंधित वाहनचालकाला चांगलीच अद्द्ल घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतूक प्रशासनाच्या वतीने सुरळीत व शिस्तशीर वाहतूकीसाठी कडक कारवाई सुरु केली आहे. हेल्मेटचा उपयोग न करणे, नो पार्किंग मध्ये वाहन पार्क करणे, सिग्नल तोडणे, सीट बेल्ट न लावणे, लेन ब्रेक करणे यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे वाहनचालकांकडून दंड वसूल केला जात आहे. दंड वसूली करत असताना कर्मचा-यांशी वाद घालणा-यांवर देखील शिस्तभंग व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. एकूणच संपूर्ण सुरळीत वाहतूकी करीता प्रशासनाने जोरदार कारवाईला सुरुवात केली असून दुसरीकडे पुणेकरांनीही दंडवसूली विषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात प्रामुख्याने सध्या हेल्मेटसक्तीची कारवाई आता सीसीटीव्हीव्दारे होत असून प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला दंड वसूल करण्या करीता मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे शहरातील चौकाचौकात मोठ्या संख्येने वाहतूक पोलीस कर्मचारी दंड वसूलीसाठी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून हेल्मेट परिधान न करणा-यांवर कारवाई करण्यात येत आहे.

Related Articles

Close