Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
देश/विदेश

एक्झिट पोल चुकीचे, अंतिम निकालांची वाट पाहू – शशी थरुर….

विरोधी पक्षांना जबर धक्का देत रविवारी लोकसभा निवडणूक २०१९ चे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर हे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारलाच जनतेचा कौल मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. पुन्हा एकदा देशात मोदी सरकारच सत्तेत येणार असल्याची चिन्हं या एक्झिट पोलमधून देण्यात आली. विरोधी पक्षांना दणका देणाऱ्या याच एक्झिट पोलविषयी काँग्रेस नेते शशी थरुर यांनी आपली प्रतिक्रिया देत हे एक्झिट पोल स्पष्टपणे नाकारले आहेत. निवडणुकांच्या अंतिम निकालांची वाट पाहण्याचं म्हणत त्यांनी ट्विट केलं. 'माझ्या मते एक्झिट पोल हे चुकीचे आहेत. मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियामध्ये ५६ एक्झिट पोल चुकीचे ठरले होते' भारताचं म्हणाल तर, इथे जनता मोठ्या प्रमाणावर सत्य सांगण्यापासून दूर राहते म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली. एक्झिट पोलचे सर्व अंदाज धुडकावून लावत थरुर यांनी आपण निवडणुकांच्या अंतिम आणि तितक्याच खऱ्या निकालांची वाट पाहू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Close