You cannot copy content of this page
मुंबई

२८१ व्या वसई विजय दिनासाठी वसई नगरी सज्ज…..

वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या सहकार्याने व वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आणि वसई विजय स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८१ वा वसई विजयोत्सव दिन दिनांक १८ मे २०१९ शनिवार बुद्धपोर्णिमा रोजी साजरा करण्यात येणार आहे. दिनांक १८ मे २०१९ शनिवार रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी ७ वाजता श्रीमंत नरवीर चिमाजी आप्पा स्मारक येथून जंजिरे वसई किल्ला अभ्यास सफरीस सुरुवात होत असून सदर मोहिमेत सहभागींना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. श्रीदत्त राऊत उपस्थित राहणार आहेत. दुपारी ठीक ३ वाजता श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर वज्रेश्वरी ता.भिवंडी येथून दरवर्षीप्रमाणे मशालयात्रा सुरू होणार आहे. या मशाल यात्रेचे नेतृत्व वसई ऍडव्हेंचर क्लबचे प्रतिनिधी प्रेषित राऊत व पंकज वर्तक हे करणार आहेत. या प्रसंगी श्री. वज्रेश्वरी येथे मुख्य पूजनासाठी बळीराम जाधव माजी खासदार उपस्थित राहणार आहेत. सायं ५ वाजता नरवीर चिमाजी आप्पा मैदान येथे लेझीम ढोल पथक व विशाल ढोल पथक उमेळमान अंतर्गत मानवंदना वादन होईल. सायं ७ वाजता श्रीमंत नरवीर चिमाजी आप्पा अश्वारूढ पुतळा पूजन व पुष्पहार अर्पण कार्यक्रम होईल. यावेळी नरवीर चिमाजी आप्पा स्मारक पूजनासाठी वसई विजय स्मारक समितीचे पदाधिकारी भाऊसाहेब मोहोळ, डॉमनिक घोन्सालवीस, बबनशेट नाईक व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी लोकनेते हितेंद्र ठाकूर आमदार वसई यांच्या हस्ते मशाल पूजन करण्यात येणार आहे. रुपेश जाधव यांच्या हस्ते चिमाजी आप्पा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. या दिनाचे औचित्य साधून सायं ७.१५ वा क्षितिज ठाकूर नालासोपारा यांच्या हस्ते किल्ले बांधणी प्रदर्शन, मिसळ व पारंपरिक खाद्य पदार्थ महोत्सव, बालजत्रा यांचे उदघाटन होईल. सायं ७.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात जीवन गाणी हा दर्जेदार मराठी हिंदी गीतांच्या मैफलीचा कार्यक्रम होईल. दिनांक १९ मे २०१९ रविवार रोजी दिवसभर बालजत्रा, खाद्य महोत्सव, किल्ले प्रदर्शन उपक्रम सुरू राहतील. या दिनाचे औचित्य साधून अभ्यासकांनी, स्थानिक नागरिकांनी, दुर्गमित्रांनी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Related Articles

Close