You cannot copy content of this page
मुंबई

सायन रुग्णालयात महिलेवर बलात्कार….

रुग्णांनी सदैव गजबजलेल्या मुंबईतील सायन रुग्णालयात एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही महिला एका रुग्णाची नातेवाईक असल्याचे समजते. या महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव दिपक अन्नाप्पा कुंचीकुर्वे (३१) असून तो सायन रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. आपण रुग्णालयाचे बील कमी करून देऊ, असे आमिष दाखवून दिपकने या महिलेला रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरील निर्जन भागात नेले. याठिकाणी दिपकने महिलेवर अत्याचार केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सायन रुग्णालयात राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक २४ तास तैनात असूनही हा प्रकार कसा घडला, अशी शंकाही उपस्थित झाली आहे. पिडित महिलेची बहीण रुग्णालयात दाखल आहे. बहिणीची देखभाल करण्यासाठी पिडित महिला रुग्णालयात येत असे. दिपक कुंचीकुर्वे याठिकाणी सफाई कामगार असल्याने त्याचे पिडित महिलेशी अनेकदा बोलणे होत असे. महिलेशी ओळख वाढल्यानंतर दिपकने आपण रुग्णालयाचे बील कमी करून देऊ, असे आश्वासन महिलेला दिले. त्यासाठीचा फॉर्म भरण्यासाठी दिपक पिडित महिलेला रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरील निर्जन भागात घेऊन गेला. यानंतर दिपकने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडित महिलेने तात्काळ सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तात्काळ हालचाल करत रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. यानंतर अधिक चौकशी करून पोलिसांनी दिपकला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. बलात्काराच्या कलम ३७६ अंतर्गत दिपकवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

Close