You cannot copy content of this page
मनोरंजन

यशस्वी गायिका अम्रिता पेडणेकर…..

संगीत मैफलीत गाणी गाताना शंभर टक्के देण्यासाठी जितकी मेहनत घेता येईल त्याच्याही पेक्षा जास्त तो क्षण मौल्यवान असतो असं गायिका अम्रिता पेडणेकर यांना वाटतं. “बुश इंडिया” व “अलिफ बेकर्स” या प्रायोजक आणि सहप्रायोजकांच्या मदतीने म्युझिक लव्हर्स फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्ष सुहास शिवलकर यांनी नेहमीच नवोदित आणि उमेदितल्या गायकांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या कार्यक्रमात अनेक संगीतप्रेमी गायक आणि गायिकांना मंच मिळाल्यामुळे आनंदाचे क्षण फुलले आहेत. सर्व गायक गायिकांना आत्मविश्वास देण्याची मोठी कामगीरी सुहास शिवलकर, रवी ओबेरॅाय, बिट्टुसिंग आणि लीना शिवलकर यांनी केली आहे. असे मनापासून सांगणारी गायिका अम्रिता पेडणेकर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. विशेषतः अम्रिता पेडणेकर आणि रवी ओबोरॉय यांनी सादर केलेल्या संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या गाजलेल्या "चुरा लिया तुमने जो दिलको" या गाण्याच्या ठेक्यावर रसिकांना स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलवणारी संगीत मैफल अविस्मरणीय ठरली.

Related Articles

Close