You cannot copy content of this page
ठाणे

गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका इसमास मुंब्रा पोलिसांकडून अटक…..

गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका इसमास मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. इरशाद इकबाल इनामदार असे या इसमाचे नाव असून त्याच्याकडून जवळजवळ ५ लाख ९५ हजार ९३० रु. किंमतीचा गांजा हस्तगत केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे यांना मुंब्रा बायपास रोड, बंद टोलनाक्याजवळ, मोकळ्या मैदानात, कौसा येथे एक इसम गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली. या माहितीवरून मुंब्रा पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून इरशाद यास ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ३९ किलो ७०० ग्रॅम वजनाचा, ५ लाख ९५ हजार ९३० रु. किंमतीचा गांजा आढळून आला. सदर प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Close