Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
नागपूर

‘ ईडी ’ दणका, नागपूरमध्ये ४८३ कोटींचा मॉल जप्त…..

अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी नागपूरमधील केएसएल अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची मालकी असलेल्या इम्प्रेस मॉलवर जप्तीची कारवाई केली आहे. या मॉलची किंमत सुमारे ४८३ कोटी रुपये इतकी असून आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायदा (पीएमएलए) या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेची फसवणूक केल्या संदर्भात केएसएल अँड इंडस्ट्रीजवर कारवाई करताना अंमलबाजवणी संचालनालयाने मंगळवारी नागपूरमधील ४८३ कोटी रुपयांचा व दोन लाख ७० हजार ३७४ चौरस फूटांचा शॉपिंग मॉलच जप्त केला. मुंबईतील तायल ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकीची ही कंपनी आहे. तायल समूहाच्या तीन कंपन्यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या तक्रारींची दखल घेत सक्त वसुली संचालनालयानं कारवाई सुरू केली. अक्टिफ कॉर्पोरेशन लि., जयभारत टेक्सटाइल्स अँड रीयल इस्टेट लि. व एस्के नीट (इंडिया) लि. अशी या कंपन्यांची नावे असून बँक ऑफ इंडिया व आंध्र बँकेकडून २००८ मध्ये ५२४ कोटींची कर्जे घेतली व बँकांना फसवलं असा आरोप आहे.

Close