You cannot copy content of this page
पालघर

पालघर जिल्ह्यातील तलासरीमध्ये एकाच मंडपात आठ वधू-वर बोहल्यावर….

सध्या लग्न सराई जोरात चालू आहे. कोण-कोणत्या पध्दततीने लग्न करतील याचा नेम नाही. असेच एक वेगळ्या प्रकारचे लग्न पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात येत्या 25 मे ला होणार आहे. सध्या या लग्नाची पत्रिका सोशल मिडिया वर चर्चेचा विषय ठरला आहे. एक वर व दोन वधू अशा प्रकारचा विवाह तलासरी मधील वसा येथे संजय याचा बेबी व रिना यांच्यासोबत गेल्या 22 एप्रिलला पार पडला. आता एकाच मंडपात आठ वधू-वराचा विवाह होणार आहे. तलसारी ग्रामीण भागात लग्नाच्या रीती-रिवाज जास्त आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबाना लग्न करणे परवडत नाही. त्यातच अशा पध्दतीने लग्नाचे आयोजन तलासरी मधील सुतारपाडातील पाडकरी व समर्थ युवा बचत गट यांनी केले आहे. त्यामुळे येत्या 25 मे ला प्रकाश, शुभाष, चेतन, संतोष, संदिप, लहानू, नितीन, अविनाश हे आठ वर (सुतार व इरम परिवारातील) लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

Related Articles

Close