You cannot copy content of this page
पुणे

पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक…..

पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पुणे - पान टपरीवर अनाधिकृतपणे सिगारेटची विक्री करतो म्हणून कारवाईचा बडगा उगारून पान टपरी चालकाकडे ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून २० हजार रूपयाची लाच खासगी इसमामार्फत स्विकारणारा पोलीस कर्मचारी आणि खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. पोलिस नाईक संजय भिला वाघ आणि किरण प्रकाश पाले अशी या अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदाराची परिसरात पानाची टपरी आहे. पान टपरीवर अनाधिकृत सिगारेटची विक्री करतो म्हणुन पोलिस कर्मचारी वाघ हे तक्रारदारास कारवाईची भाषा करत होते. कारवाई न करण्यासाठी त्यांनी ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. दि.१० मे रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पोलिस नाईक संजय वाघ हे लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्नप झाले. या तपासावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी पुणे-मुंबई हायवे वरील हॉटेल यशोदासमोर सापळा रचून या दोघांना अटक केली. सदर प्रकरणी त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Close