You cannot copy content of this page
Breaking News

विरोधकांचे पितळ उघडे पाडण्यासाठी माझ्याकडे शंभर बॉम्ब:आ. क्षीरसागर………

माझ्याविरोधात षडयंत्र करून उमेदवारी मिळवून देण्यासाठी चा घाट सुरू आहे पण पक्षश्रेष्ठीचा माझ्यावर पूर्ण विश्वास असून मलाच उमेदवारी मिळणार त्यामुळे येतील त्यांना सोबत घेऊन आणि न येणाऱ्यांच्या छाताडावर पाय ठेवून निवडणूक लढवणार विरोधकांचे पितळ उघडे पाडण्यासाठी माझ्याकडेही शंभर बॉम्ब तयार आहेत हे त्यांनी विसरू नये असा इशारा पालकमंत्र्यांचे नाव न घेता आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या दुसऱ्या दिवसापासून येणाऱ्या राजकीय अडचणीबाबत बोलताना ते म्हणाले माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीने पहिल्याच निवडणुकीत मोठ्या व्यक्तीला पराभूत केले त्यावेळेपासून राजकीय अडचणीचा सामना करण्याचे बळ माझ्याकडे आले आहे सध्याचे म्हणाल तर माझ्या विरोधात बदनामीचे षडयंत्र करून मला निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी आणि विधानसभा उमेदवारी मिळू नये यामुळे विरोधकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत युतीसाठी प्रचंड काम केले. आहे यावर्षी पूर्ण ताकद पणाला लावली असून लोकसभेचा युतीचा उमेदवार 25 हजारांचे लीड घेऊन विजयी होणार यात शंका नाही. असेही त्यांनी सांगितले देशाचे राजकारण संपले आता राज्यासाठी काम करुन युतीची सत्ता आणून मुख्यमंत्री करण्यासाठी काम सुरू आहे मला निवडणुकीची भीती नाही मीच निवडून येणार आणि राज्यात युतीची सत्ता आली तर मी; मंत्रिपदही घेईन असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Close