You cannot copy content of this page
ठाणे

राकेश शेट्टी हत्येच्या कटातील गँगस्टर अली बशीद अली शेख यांस ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक…..

राकेश रमण राय उर्फ राकेश शेट्टी याच्या हत्येच्या कटातील अली बशीद अली शेख यांस ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर न. २०७/२००५ भा.द.वि.कलम ३०२, १२० (ब), ३४ सह भा. ह. कायदा कलम ३,२५ या गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथक ठाणे करत असून यातील मयत राकेश रमण राय उर्फ राकेश शेट्टी व अटक आरोपी हरिष जवाहरलाल वझराणी यांच्यात मयत चालवत असलेले 'धुरू बार अँड रेस्टोरंट' या जागेवर आपसात वाद होता. सदरचा बार हा आरोपी हरिष वझराणी याचा भाऊ मनोहर वझराणी यांच्या मालकीचा असून नमुद बार हा मयत राकेश शेट्टी हडप करण्याच्या तयारीत असल्याने राकेश शेट्टी यास जीवेठार मारण्यासाठी खुनाचा कट रचून फजलु रहेमान, उदय शेट्टी, राजू भाई यांना २० लाख रुपयांची सुपारी दिली होती. तेव्हा अटक आरोपी व पाहिजे आरोपी यांनी आपसात संगणमत करून फजलु रहेमान, गॅंगच्या इसमाकडून मयताच्या पाठीवर व छातीवर अग्निशस्त्रातुन गोळीबार करून जीवेठार मारले होते, सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी हरिष जवाहरलाल वझराणी, सुनील शिवअण्णा शेट्टी यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गॅंग लीडर गुन्हेगार फजल उर रहेमान उर्फ फजलु उर्फ सिंग उर्फ मोना तनवीर उर्फ डॉक्टर उर्फ चिंगचौंग उर्फ अली बशीद अली शेख याचा डी.सी.बी.पोलीस स्टेशन अहमदाबाद गुजराथ गुन्हा रजिस्टर नंबर १४/ २००० भा.द.वि. कलम ३६३, १२० (ब) ४११, ३८७, ५११ या गुन्ह्यातून ट्रान्सफर वारंटद्वारे एडिशनल सेशन कोर्ट अहमदाबाद गुजराथ यांचे कोर्टातून ताबा घेऊन अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे येथे चालू आहे.

Related Articles

Close