You cannot copy content of this page
पुणे

पुण्यात साडी सेंटरला लागलेल्या भीषण आगीत ५ कामगारांचा होरपळून मृत्यू…..

पुण्यात साडी सेंटरला लागलेल्या भीषण आगीत ५ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. देवाची ऊरळी येथे एका साडी सेंटरला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत ५ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राजयोग साडी सेंटर या दुकानाला पहाटे ४.३० च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र आगीत दुकानात अडकलेल्या ५ कर्मचाऱ्यांचा गुदमरून आणि होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि आठ ते दहा टॅंकरने ही आग विझविण्यात आली. सकाळी पावणेसातच्या सुमारास या दुकानामधून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Related Articles

Close