You cannot copy content of this page
पुणे

पुण्यात सैगल मुकेश संगीत महोत्सव संपन्न…..

बहिणाबाई चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंधर्व एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील एस.एम.जोशी सभागृहात सैगल मुकेश संगीत महोत्सव संपन्न झाला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या संगीतमय सुवर्ण काळातील सुप्रसिद्ध गायक स्व.के.एल सैगल यांच्या ११५ व्या जंयती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायक सतीश बारावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात सतीश बारावकर आणि संयोगिता बादरायणी या गायकांनी सादर केलेल्या विविध प्रकारच्या सुपरहिट गाण्यांना मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद दिला. कुंदन लाल सैगल यांचे परमभक्त असलेले गायक सतीश बारावकर हे नेहमी फक्त सैगल आणि मुकेश यांच्या गाण्यांचे सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध करतात, यात मुळीच शंका नाही. जब दिल ही टुट गया, आवारा हु, मेरा प्यार भी तुही, मधुकर शाम हमारे, दो कदम हम भी चले, दिया जला झगमग झगमग, एक बंगला बने न्यारा, अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून या दोन्ही गायकांनी रसिकांची मने जिंकली. या सैगल मुकेश संगीत महोत्सवाचे सुत्रसंचलन, निवेदन निवेदिका प्राजक्ता श्रावणे यांनी केले ‌होते. या कार्यक्रमाला तुकाराम शेठ, रामदास गायकवाड, किरण खडके, रमेश कानडे, मुकेश ललगुणकर, सुरेश खडुसकर, नथु नारवाणी, आवटे, संदीप पंचवटकर, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राजे आणि चाकणचे अनेक नामवंत मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Close