Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
नवी मुंबई

नवी मुंबईत शहीदांच्या परिवाराचा सन्मान….

देवभुमी लोककला उद्दगम मंच चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने आयोजित केलेला "सिपैजी" हा कार्यक्रम ऐरोली नवी मुंबई येथे संपन्न झाला. सिपैजी या कार्यक्रमात झुलाघाट, पिथौरागडचे रहिवासी शहीद सैनिक दिवान सिंह ऐरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच या शहीद जवानाची बहिण रेवती ऐरी कठायत यांना सन्मानित करण्यात आले. शहीद जवानांच्या अतुलनीय पराक्रमला सलाम करून त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा नागरिकांना कधीही विसर पडणार नाही असे संस्थेचे संस्थापक दिवाण रामसिंह सौनं यांनी सांगितले. या कार्यक्रमात संस्थेच्या कलाकारांनी जवानांच्या जीवनावर आधारित एक नाटक सादर केले. या नाटकाच्या माध्यमातून निर्मला मेहता मधू पेन्युली, गायत्री बिष्ट, हेमंत बिष्ट, अंकीत आणि पवन नेगी या कलाकारांनी उत्कृष्टरित्या अभिनय सादर केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयला दाद दिली. या कार्यक्रमाला दीपा दिवान सिंह सौन, भूपाल सिंह बिष्ट, नरेंद्र सिंह सौन, नीलम गोदियाल, दिलवर सिंह रावत, सुरेश भट्ट, गणेश भट्ट, महेश भट्ट, सुषमा गोदियाल, मीना नेगी , समशेर सिंह सौन, योगेंद्र सिंह बिष्ट, धर्मेंद्र सिंह बिष्ट आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Close