Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
नवी मुंबई

नवी मुंबईत महात्मा बसेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी….

जय शिवा 12 व्या शतकामध्ये जगात सर्वप्रथम लोकशाही संसद चालवणारे, सर्वांना समतेचा संदेश देत जाती - पातीला थारा न देणारे, महिलांना पुरुषाबरोबर अधिकार देणारे, कर्म हेच दैवत सांगणारे, अंधश्रद्धेला कडाडून विरोध करणारे, 18 पगड जातींना एकत्र आणून सर्वप्रथम आंतरजातीय विवाह लावणारे असे महामानव, संमतानायक, क्रांतीसुर्य, जगतज्योती, महात्मा, बसवेश्वर यांची जयंती 7 मे 2019 अक्षय तृतीय या शुभदिवशी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमावेळी महात्मा बसवेश्वर यांनी केलेल्या समतेच्या कार्याची प्रेरणा भारतवासीयांनी घ्यावी हा विचार मांडण्यात आला. यावेळी महापौर (नवी मुंबई), उद्धव खराडे (शिवा संघटना नवी मुंबई (अध्यक्ष)) आणि संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Close