You cannot copy content of this page
Breaking Newsदेश/विदेश

गडचिरोलीतील जांभुरखेड्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात १६ जवान शहीद …..

राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी- ६० पथकाचे १६ जवान शहीद झाले आहेत. आज सकाळी (बुधवारी) साडे अकराच्या सुमारास सी- ६० पथकाचे जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात होते. कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर जवानांचे खासगी वाहन आले असता नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १६ जवान शहीद झाले. दरम्यान, घटनास्थळी नक्षलवादी आणि पोलिसांदरम्यान चकमक सुरु असल्याचे वृत्त आहे. परिसरात तब्बल २०० नक्षलवादी लपून बसल्याचे वृत्त आहे.

Related Articles

Close