Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Breaking Newsपालघर

पालघर लोकसभा निवडणुकीत मतदाराचा उत्साह, राजेंद्र गावित व बळीराम जाधव यांच्यात टक्कर….

महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील 17 जागांसाठी आज मतदान झाले. राज्यातील बहुचर्चित असलेली पालघर लोकसभा निवडणुकीचे आज मतदान झाले. अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदार संघात एकूण 6 विधानसभा अंतर्गत डहाणू-2,69,988 विक्रमगड-2,64,132 पालघर-2,71,167 बोईसर-2,97,915 नालासोपरा-4,87,560 व वसई-2,94,535 असे एकूण मतदाराची संख्या 18 लाख 85 हजार 297 आहेत. या मतदार संघात माजी राज्यमंत्री व खासदार राजेंद्र गावित व माजी खासदार बळीराम जाधव यांच्यात खरी लढत पहायला मिळाली. एका बाजुला महाआघाडी तर एका बाजुला महायूती अशी सरळ लढत होती. पालघर लोकसभा निवडणूक आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 58% मतदान झाले. आज पालघर मधील तपमान 40 अंश इतके असूनही शहरी व ग्रामीण भागातील मतदार राजाचा उत्साह पहायला मिळाला.पालघर मधील राजेंद्र गावित व बळीराम जाधव यांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून मतदार राजाने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे येणाऱ्या 23 मे च्या निकालाच्या दिवशी समजणार आहे.

Related Articles

Close