You cannot copy content of this page
Breaking Newsपालघर

पालघरमध्ये ‘कौशल्य विकास शिबिर’ संपन्न….

पालघर जिल्ह्यातील मनोर गावातील सुर्या कॉलोनी मधील टाकवाहळ आश्रम शाळेत कौशल्य विकास शिबिराचे आयोजन आज दि. २६ एप्रिल रोजी व्हेंचर फाऊंडेशन महाराष्ट्र, आधार युवा संस्था पालघर, टायगर फोर्स आणि मिडिया पार्टनर महाराष्ट्र न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या शिबिरात इयत्ता ९ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन ट्रेनर संतोष सकपाळ यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक युवराज सुर्ले यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून करण्यात आली. या शिबिरात तीनशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विक्रांत राऊळ (व्हेंचर फाऊंडेशन महाराष्ट्र), माधव तल्हा (आधार युवा संस्था पालघर जिल्हा अध्यक्ष), युवराज सुर्ले (महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक), माळी (टाकवाहळ आश्रम शाळा मुख्यध्यापक), संख्ये (शिक्षक) भोये (गोवाडे आश्रम शाळा मुख्यध्यापक), कपिल सूर्यवंशी (महाराष्ट्र न्यूज सल्लगार), निलेश कासट (उप-संपादक, पालघर), अनुज केसरकर (उप-संपादक, मुंबई), अमृता चौहान (उप-संपादक, ठाणे) आणि आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Close