Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Breaking Newsपालघर

पालघर मध्ये वाडा तालुक्यात वन अधिकाऱ्याची दबंगगिरी…..

येथील वनविभाग (पश्चिम) कार्यालयाच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम काही आदिवासी मजुरांनी केले होते. या कामाची मजुरी मागायला गेलेल्या या मजुरांवर वनविभाग पश्चिमचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांनी आपल्याकडील पिस्तूल रोखत दबंगगिरी केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. तालुक्यातील वनविभाग (पश्चिम) कार्यालया अंतर्गत येणार्याळ आबिटघर परिसरातील वनक्षेत्रात शासनाच्या वृक्षलागवडीच्या अभियानाकरिता खड्डे खोदाईचे काम हाती घेण्यात आले होते. या कामावर डिसेंबर 2018 मध्ये आबिटघर येथील भरत गोविंद जाधव, भाग्यश्री भरत जाधव, आंबो बापू खुताडे, सखाराम गोविंद जाधव या मजूरांनी काम केले होते. या कामाची मजुरी आजवर वनविभागाने दिली नाही. म्हणून हे आदिवासी मजूर आज (मंगळवारी) वनविभागाच्या कार्यालयात गेल्या चार महिन्यापासून आपली मजुरी का मिळत नाही याची विचारणा करण्यासाठी गेले असता वन परिक्षेत्र अधिकारी तोंडे यांनी मजुरीचे पैसे देण्याऐवजी या मजूरांवर थेट पिस्तुल रोखून धमकावल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेने भयभीत झालेल्या या आदिवासी मजूरांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन गाठेल असता सायंकाळी उशीरापर्यंत तक्रार नोंदविण्यासाठी मजूर व श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ पोलिस स्टेशनमध्ये बसून होते. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी तोंडे देखील हजर होते. दरम्यान तोंडे विक्रमगड येथे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असून वाडा पश्चिम वनविभागाचा अतिरिक्त प्रभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. विक्रमगड तालुक्यातही त्यांच्या दबंगगिरीचे किस्से जोरदार चर्चीले जात आहेत. अनेक सामान्य आदिवासी नागरिकांना नाहक पिस्तुलाचा धाक दाखवत कारवाई केल्याच्या घटना घडल्या असून यासंदर्भात नागरिकांनी तोंडे यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.

Related Articles

Close