Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
नवी मुंबई

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एकाला अटक …..

तळोजा पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एका इसमास अटक केली आहे. अरुण विठ्ठल बेनकनहळी असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या जवळ एकूण ३२,४०० /- रु.किमतीची बेकायदेशीर शस्त्र आढळले आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळोजा पोलीसांकडून गुन्हेगार विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई दरम्यान गुप्त बातमी दारा मार्फत गुन्हे प्रकटीकर पथकास तळोजा फेज-१ शिर्के कन्ट्रक्शन जवळ से .२६. येथे एक इसम बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगून असल्याची माहिती मिळाली. या माहिती वरून सपोनि .सुधीर निकम. पोउनिरी. बिराप्पा लातुरे व पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून या इसमास ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ भारतीय बनावटीचे लोखंडी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे बेकायदेशीर रित्या बाळगल्याचे आढळून आले . सदर प्रकरणात या इसमास अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता दि: २३ एप्रिल २०१९ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे .आरोपीने सदर अग्नीशस्त्र कोठून मिळवली आहेत याचा तपास चालू आहे. सदरची कारवाई अशोक दुबे पोलीस उपयुक्त परी .२, रवींद्र गिड्डे सहा पोलीस आयुक्त पनवेल विभाग, वपोनिरी. अजयकुमार लांडगे तळोजा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी सुधीर निकम, पो उपनिरी बिराप्पा लातुरे, पोना .सचिन टिके, पो ना .कुंभार, पोना. पाटील, पोहवा. शिंदे, पोना.पवार, पोना .पाटील, पो.शि .पाटील व पो शि .माळशिकारे यांनी केली असून पुढील गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.

Related Articles

Close