You cannot copy content of this page
अहमदनगर

मद्यपान करुन ‘डांगडिंग’ करणारे २ पोलीस तडकाफडकी निलंबित…..

दारू पिऊन ड्युटी करणाऱ्या पोलिस मुख्यालयातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी ही कारवाई केली. निलंबित करण्यात आलेले पोलीस कर्मचारी साहेबराव कोरडे, बाबासाहेब शिरसाठ हे दोघे राहाता येथे निवडणूक मतदान यंत्राच्या स्ट्रॉंग रूमवर ड्युटीवर होते. दोघेही मद्यधुंद अवस्थेत ड्युटी करीत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत दोघेही ड्युटीवर असताना दारूच्या नशेत आढळून आले. त्यामुळे याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी या दोनही पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून तडकाफडकी निलंबित केले आहे. ड्युटीवर असताना हलगर्जीपणा केल्यास कुठल्याही प्रकारची मुलाहिजा बाळगली जाणार नाही. निवडणूक काळात सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य व्यवस्थित बजवावे. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस सूत्रांनी दिला आहे.

Related Articles

Close