Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
अकोला

70 ते 80 गौवंशांची सुटका; एलसीबीची कारवाई …..

अकोल्यातील हिवरखेड परिसरात कत्तली करीता गौवंशाची वाहतूक करणाऱ्या अठरा पिकअप वाहनांना अकोला पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. या दरम्यान अंदाजे 70 ते 80 गौवंशाची सुटका करण्यात आली असून आणखी गौवंश वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी वाहन चालकासह काही जणांना ताब्यात घेतले आहे तर काही जण घटनास्थळावरून पसार झाले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममता वादे पोलीस कर्मचारी अब्दुल माजिद, शेख हसन, इजाज अहमद, रवी इरचे, संदीप कटाकर, भाऊलाल हेबार्डे, मनोज नागमते, अभय बावस्कर, ढोरे यांनी केली आहेय. हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दित ही कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येतंय.

Close