Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
नवी मुंबई

महाराष्ट्र न्यूजच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना पुरस्कार….

महाराष्ट्र न्यूजच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. डोंबिवलीतील जोंधळे पॉलीटेकनिक हायस्कुलमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ९ मार्चला करण्यात आले होते. यावेळी कायदा, शिक्षण, उद्योग, समाजसेवा, गृहिणी इ. क्षेत्रात आपल्या कार्यातून यशस्वी ठसा उमटविणाऱ्या महिलांना ट्रॉफी आणि बुके प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. तसेच आर्टिस्ट आशिष सातपुते आणि त्यांच्या टीमने मिमिक्री, होम मिनिस्टर असे महिलांना खास आवडणारे कार्यक्रम करून त्याचे मनोरंजन केले यासोबतच या कार्यक्रमात लहान मुलींच्या नृत्याची जोड देखील होती. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक युवराज सुर्ले यांनी केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नमिता अंकुलेकर (IRS), शिवाजी शिंगे (युवा पत्रकार संघ, अध्यक्ष कोल्हापूर ), मोहिनी दुखंडे (क्रांतीज्योती महिला परिवर्तन केंद्र संचालिका), अमित दुखंडे (महाराष्ट्र न्यूज संपादक, आधार इंडिया भारत परिवर्तन परिषद महाव्यवस्थापक), भूपेंद्र मेस्त्री (सहाय्यक निर्देशक आकाशवाणी), किशोर म्हात्रे (महाराष्ट्र न्युज सल्लागार) आदी उपस्थित होते. तर विजय हुपरीकर (संपादक, सांगली), अनुज केसरकर (उपसंपादक, मुंबई), अमृता चौहान (उपसंपादक, ठाणे), निलेश कासट(उपसंपादक, पालघर), कय्युम शेख (उपसंपादक, कोल्हापूर), विशाल सुतार (प्रतिनिधी), संतोष कांबळे (प्रतिनिधी), रवींद्र जाधव (प्रतिनिधी), म्हलारी घाडगे (प्रतिनिधी), शरद माळी (प्रतिनिधी), ही सर्व महाराष्ट्र न्यूजची टीम आणि युवा पत्रकार संघ कोल्हापूरची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Related Articles

Close