Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Breaking Newsदुनिया

किनगावात ग्रामस्थांना करावा लागतोय पाणीटंचाईचा सामना…..

मार्च महिन्याला सुरुवात होणार असुन उन्हाचे तीव्र झटके जाणवायला सुरुवात झाली आहे. यावर्षि अत्यल्प पाऊस झाल्याने महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. त्यात महाजल योजनेतील भ्रष्टाचाराने ग्रामीण भागातील पाणीपुरवठेचा ठेचा निर्माण करुन ठेवल्या गेल्याचे सुबोध सावजींच्या व्यापक आंदोलनातुन दिसुन आले. किनगाव जटु येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असुन मिळेल तेथुन डोक्यावर पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे. पाणीपुरवठा गाव नळयोजना नावालाच ठरलेली आहे. आठवड्यातून तर कधी पंधरवाड्यातुन एकदाच पहाटे नळाला पाणी येत असल्याने पुरेसे हाल सोसावे लागत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. येथील माजी सरपंच माधवराव बिनिवाले यांनी आपली विहीर ग्रामस्थांसाठी पिण्याचे पाणी भरण्यासाठी खुली ठेवली आहे. ऐन दुष्काळात वर्षानुवर्ष यांनी गोरगरिबांना मदत केलेली आहे.गावातील हातपंप पाण्याअभावी शोभेची वस्तु ठरली आहे कोणी मोटरसायकलवर कँन लावुन तर कोणी गाडीबैलव्दारे पाणी आणत असल्याचे पहावयास मिळते आहे. ३००-४०० रुपये देऊनही काही लोक टँकर्सव्दारे पाणी विकत घेत आहेत.जी पाणीटंचाई मे महिन्यात असते तेच भीषण चित्र मार्चपुर्वीच पहावयास मिळते आहे. मारोती मंदिराजवळील विहीरीतील पाणी आठत असल्याने अर्धा गावात पाणीप्रश्न मोठा कठीण झालेला आहे. चौदाव्या वित्त आयोगातुन पाण्यासाठी मोठा खर्च फक्त कागदोपत्रीच झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सचिन नागरे यांच्याकडून होत आहे. पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामपंचायतजवळील बोअरवेलजवळ सिमेंटची टाकी बांधण्यात आलेली नाही. मागील वर्षापासुन ग्राम विकास अधिकारी ए.के.नवले यांनी दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. याविषयी तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Close