You cannot copy content of this page
नासिक

रावधानोरा येथे श्रीसाईबाबा मंदिर वर्धापन सोहळा उत्साहात साजरा…..

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या रावधानोरा बु येथे वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय किर्तन सोहळा रंगला. यात प्रथम दिनी हभप गंगाधर महाराज शेलगावकर यांचे किर्तन संपन्न झाले. ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, तसेच हरिपाठ सोहळा ही रंगला. या दोन दिवसीय कार्यक्रमाची सांगता हभप मोहनमहाराज कर्दळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. या कार्यक्रमाचे आयोजन रावधानोरा येथील देशमुख कुटूंब व गावक-यांनी केले. यात दत्तराव देशमुख, सुधाकरराव देशमुख, शंकरराव देशमुख, कैलासराव देशमुख, शिवानंदराव देशमुख, सुश्मिता देशमुख व गावक-यांनी सर्व जबाबदारी पार पाडली. यात भजनासाठी तळेगाव, पांगरी, जुन्नी, बाचेगाव येथील टाळकरी,गायक,वादक होते. या कार्यक्रमाला भाजपा नेते राजेश संभाजीराव पवार यांनी आवर्जून उपस्थिति लावली.

Close