You cannot copy content of this page
नासिक

निर्भय होण्यासाठी सक्षम आरोग्याची गरज – डॉ.वर्षा झंवर….

महाविद्यालयातील मुलींनी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक विकास करण्याकरिता निर्भय होण्याची आवश्यकता असून निर्भय होण्यासाठी सक्षम आरोग्य ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे, नाशिक व अहमदनगरचे लायन्स क्लबच्या अध्यक्षा डॉ. वर्षा झंवर यांनी केले. त्या श्री सदगुरु गंगागीर महाराज कॉलेज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्भय कन्या अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभागप्रमुख डॉ. बी.आर.शेंडगे हे होते. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात मुलींनी ज्ञानाबरोबरच क्रिडाकौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळाचे चेअरमन व कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. रमेश झरेकर यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रा.डॉ.राजाराम कानडे, प्रा.गणेश विधाटे, इ.उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी.बी.सावंत यांनी केले तर आभार प्रा.सुकेसिनी बनसोडे यांनी मानले. सदर कार्यक्रम नियोजनात अधीक्षक सुनील गोसावी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर सेवकांचे सहकार्य लाभले. यामध्ये विद्यार्थ्यांनीच्या शंकेचे समाधान डॉ. वर्षा झंवर यांनी केले.

Close