You cannot copy content of this page
रत्नागिरि

नवसाला पावणारी भराडी देवीची (आंगणेवाडी) जत्रा २५ फेब्रुवारीला…..

नवसाला पावणारी देवी म्हणुन ख्याती असणारी आंगणेवाडी ही मसुरे गावातील वाडी सर्वांत मोठा गाव म्हणून मसुरेची ओळख आहे. ही वाडी सिंधुदुर्ग जिल्यातील मालवण तालुक्यात आहे. आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख कुठच्या तिथी अथवा वारानुसार ठरत नाही. यात्रेची तारीख देवीचा कौल घेऊन ठरवली जाते. यात्रा दोन दिवस चालते. यात्रेची लगबग देवदिवाळीपासून सुरू होते. देवदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळप होते. तिसऱ्या दिवशी प्रमुख आंगणे मानकरी देवळात जमतात. ते मानकरी वंशपरंपरागत असले तरी दरवर्षी चार नवीन मानकरी निवडले जातात. मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात आणि देवीने कौल दिला की यात्रेची तारीख ठरवली जाते .यावेळी आंगणेवाडीची जत्रा २५ फेब्रुवारीला आहे. जत्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने आंगणेवाडीला जातात. त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून आंगणेवाडी जत्रेसाठी विशेष १० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी, नारळाचे तोरण घातले जाते. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते. सीएसएमटी ते करमळी दोन विशेष गाड्या सोडण्यात येतील. गाडी क्रमांक ०११५७ सीएसएमटीहून २३, २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम या स्थानकांवर थांबेल. लोकमान्य टिळक टर्मिनस पनवेलहूनही विशेष गाड्यांची सुविधा उपलब्ध आहे.या यात्रेसाठी अनेक राजकीय, कला, क्रीडा सामजिक क्षेत्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

Close