You cannot copy content of this page
Breaking Newsरत्नागिरि

उल्हासनगर मध्ये स्लॅब कोसळून तीनजण जखमी तर तिघांचा मृत्यू…..

उल्हासनगरमधील एका इमारतीत स्लॅब कोसळून तीनजण जखमी तर तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर नं.3, इंदिरा गांधी मार्केट, महाराजा हॉल जवळ, मेमसाब इमारतीमध्ये ३ फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सदर घटनेत मेमसाब इमारतीमधील (G+5) पहिल्या व दुस-या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावरील साई आशिर्वाद क्लिनिक मध्ये पडला असून तिघांचा मृत्यू तर तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे दाखल करण्यांत आले आहे. 1. श्रीमती. हिराखेम चंदानी(80 वर्षे/स्त्री) 2. श्रीमती. वंदाना मोर्या(24 वर्षे/स्त्री) 3. खुशी मोर्या(02 वर्षे/स्त्री) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत तर 1. नितू साजेदा (60 वर्षे/स्त्री) 2. अनिता मोर्या(30 वर्षे/स्त्री) 3. प्रिया मोर्या(03 वर्षे/स्त्री) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

Related Articles

Close