You cannot copy content of this page
Breaking News

1 फेब्रुवारीपासून टीव्ही बंद झाल्यास केबलचालकांचा संबंध नाही – अनिल परब……

1 फेब्रुवारीपासून टीव्ही बंद झाल्यास केबलचालकांचा संबंध नाही, असा इशारा शिवसेनेच्या केबल चालकांच्या संघटनेचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिला आहे. आम्ही 200 रुपयांपासून 200 ते 350 चॅनेल दाखवत होतो. मात्र, ट्रायने तेव्हा छोटे बुके विकण्यास मनाई केली आता तेच पुन्हा छोटे छोटे बुके बनावण्यास सांगत आहेत.लोकांना स्वतःचं चैनल निवडण्याचा अधिकार आहे ही सरकारची भूमिका आम्हाला योग्य वाटली होती, म्हणून आम्ही सहकार्य केले. नियमानुसार या चॅनलची रक्कम मोजल्यास ती 450 रुपयांपेक्षा अधिक मोजावी लागणार आहे. आधी याच चॅनलसाठी आम्ही 300 रुपये आकारत होतो. रोज किंमती बदलत असल्याने ग्राहकांना कसे तोंड द्यायचे, असा आरोपही त्यांनी उपस्थित केला.

Related Articles

Close