Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Breaking News
Trending

मुंबापुरीतील खान्देशची ‘दामिनी’ अर्थात पाडळसेची यामिनी लाेहार-

मुंबापुरीतील खान्देशची ‘दामिनी’ अर्थात पाडळसेची यामिनी लाेहार यावल तालुक्याची भूमी क्रांतीची मशाल पेटवणारी अाहे. समाजमन चेतवणाऱ्या या भूमीत जन्माला अालेली पाडळसे (ता. यावल) येथील एक कन्या मुंबापुरीत (मुंबई) अापल्या जन्मभूमीसह खान्देश व परिसरातील गरजवंतांसाठी ‘सेवादूत’ म्हणून धावून येते. “मीठी बात और चेहरे पर मुस्कान यही है इनकी असली पहचान” तिच नाव अाहे यामिनी वनराज लाेहार. खर सांगायचं झालं तर तिला ‘दामिनी’ (अाकाशातील कडाडणारी वीज) म्हटलं तर अतिशयाेक्ती ठरणार नाही. जिथं स्वकीय, शेजारी,मित्र मैत्रिणी, सहकाऱ्यांशी बाेलायला वेळ नाही, जेवणाला उसंत नाही, अशा या शहरात अडलेल्या-नडलेल्या गरजवंतांना याेग्य सल्लामसलतीसाठी लाखमाेलाचा वेळ देणारी अामच्या संपर्कातील माणसं फार थाेडकी अाहेत. त्यात यामिनीचा नामाेल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच बहिणाबाईचया यावल तालुक्यातील भालाेद येथील सेकंडरी एज्युकेशन संस्थेच्या न्यू इंग्लीश स्कूल व कला, वाणिज्य महाविद्यालयात तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण , पदवीनंतर नाहाटा काॅलेज भुसावळ आणि माध्यमिक शिक्षण लोक विद्यालय पाडळसे येथे झालेले अाहे. परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक अाणि परिसरात या चळवळीला वैचारिक इंधन पुरवणारे भुसावळचे प्रा. जतीन मेढे. सौ आशालता महाजन मॅडम,कमल पाटील मॅडम,के.के.अहिरे सर व राजकारण क्षेत्रात ज्यांच्या शब्दाला वजन अाहे, असे प्रा. डाॅ. सुनील नेवे यांनी अापल्याला स्वयंसिद्धा बनवण्याचे जे धडे शिक्षण घेताना दिले ते अायुष्याचा अनमाेल ठेवा अाहे, असं ती अाैपचारीक चर्चा करताना हमखास सांगते. महाविद्यालयीन शिक्षण घेताना या आपल्या गुरूजनांची पाठ्यक्रमाचे धडे चिकित्सकपणे तर दिलेच पण सभाेवतालच्या जगाचीही अाेळखही करून दिली. म्हणूनच अाज अनेक संकटांवर मात करून धैर्याने उभे राहण्याचे बळ मिळालेय, असं सागण्यासही ती अजिबात विसरत नाही. “पाठीवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा” परिस्थिती बेताची असल्याने यामिनी गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून मुंबईत नाेकरीला अाहे.रोजगार मेळावा, व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थी सुमपदेशन, नाेकरीविषयक मार्गदर्शन, महिला स्वावलंबन आणि संरक्षण अशा विविध विषयांवर ती व्यावसायिक मार्गदर्शनही करते. स्वत:सह कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ती हे काम करीत असली तरी तिच्या अंगी ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ ही उक्ती भिनलेली अाहे. म्हणूनच ती ‘सारे काही समष्टीसाठी’ या विचारधारेतून अापल्याला शक्य हाेईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करते. फरक एवढाच अाहे, की त्याची जाहीर वाच्यता करण्याच ती टाळते. “एका गाेष्टीचा उल्लेख इथे अावर्जून करावा लागेल, ताे असा की, तीन वर्षांपूर्वी यावल तालुक्यातील हंबर्डी येथील महेंद्र पाटील नावाच्या एका विद्यार्थ्याच्या वडीलांना अाजाराने ग्रासले हाेते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे डाॅक्टांनी सुचवले हाेते. अार्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने काय करावे, त्याला समजत नव्हते. भालाेद महाविद्यालयाचे प्रा. जतीन मेढे यांच्या अाेळखीतून ताे माझ्या संपर्कात अाला. त्यानंतर त्याला अाम्ही अार्थिक मदत मिळवून दिली. त्यानंतर त्याला मुंबईत जेथे क्रिटीकल शस्त्रक्रीया हाेतात, अशा रुग्णालयातून माहिती काढायला सांगितली. यामिनी ला आमची पोस्ट फेसबुक वरून माहित होताच त्यांनी मला आणि मेढे सरांना संपर्क करून विचारणा करून माझ्या कडून शक्य असेल ती मदत मी नक्की करेन असे आश्वासन दिले.ताे पहिल्यांदाच मुंबईत जात असल्याने त्याला यामिनी लाेहारचा माेबाइल क्रमांक दिला. अापल्या गावशिवचा एक विद्यार्थी अडचणीत असल्याने त्याला शक्य हाेईल ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न यामिनीने केला हाेता. अाजही हा विद्यार्थी तिच्या सहकार्याच्या व अापुलकीच्या बाेलण्याने बाेलताना भारावून जाताे. माेलमजुरी करून समाधानाने जीवन जगणारे अाई-वडील यामिनीच्या अंगी भिनलेल्या सेवाकार्याच्या उर्मीने अक्षरश: भारावून जातात.ती आयुष्यातील प्रत्येक दुःखातून बाहेर पडून नव्या उमेदीने हसत पुन्हा ध्येयाकडे झेपावते.अशी माणसं खुप कमी असतात,जी येणार्या प्रत्येक संकटातून न डगमगता सामोरे जातात.त्यात एखादीच यामिनी असते हेही विसंबून चालणार नाही. कदाचित दु:ख हे अापल्या पाचवीलाच पुजलेलं असेल असं जिद्दीने म्हणत तिने पुन्हा मुंबईत अापल्या अावडीच्या क्षेत्रात अर्थात समुपदेशनात रमण्याचा निर्णय घेऊन कृतीशील पाऊलही उचलले अाहे. यासाठी तिला कष्टकरी अाई-वडीलांचे तसेच भावांचे जे पाठबळ मिळतेय तेही वाखाणण्याजाेगे अाहे. अाणखी एका गाेष्टीचा उल्लेख इथं करावा लागेल ताे असा की, ‘अामदार हरिभाऊ जावळे यांच्या यावल-रावेर तालुक्यात अाम्ही राहताे, असं जर कुणी यामिनीला मुंबईत भेटल्यावर सांगितलं तर तिला अाकाश मुठीत अाल्याचा भास हाेताे. त्याच कारण असं की ती त्यांच्याच संस्थेच्या महाविद्यालयात शिकलेली अाहे.’, सांगण्याचं तात्पर्य असं की संस्थाचालकांचे नाव विद्यार्थी-विद्यार्थिनी जेव्हा अादराने व अापुलकीने घेतात तेव्हा शाळा या केवळ पदव्यांची खैरात करणाऱ्या फॅक्टरी नव्हेत तर त्या संस्कारकेंद्र अाहेत, हे ध्वनीत हाेते. अशाच संस्कारक्षम शाळेतून शिक्षण घेऊन सेवेचा वसा जाेपासणाऱ्या यामिनीला वाढदिवसाच्या अामच्याकडून अक्षरशुभेच्छा. चराचरात अधिवास करणारा जगनिर्माता तिला संकटांवर मात करण्याचं अाणि समर्पित भावनेने काम करण्याचं बळ देवाे, हीच सदिच्छा यामिनी लोहार यांना ! “गम ना कर जिंदगी बहुत बडी है। चाहत की महफिल तेरे लिए सजी है। बस एक बार मुस्करा कर तो देख । तकदीर खुद तुमसे मिलने बाहर खड़ी है” मुख्य संपादक: श्री. युवराज सुर्ले , संपादक :श्री .अमित दुखंडे उप संपादक:सचिन बिराडे कार्यकारी संपादक विनोद बार्हे व टीम कडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र न्यूज चॅनेल 9833259328

Related Articles

Close