You cannot copy content of this page
Breaking News

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खानयांचे काल ३१ डिसेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नववर्षाच्या सुरुवातीलाच सिनेसृष्टीवर शोककळा पसरली.कादर खानयांचा मुलगा सरफराज याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सरफराज याने सांगितले की, माझ्या वडिलांनी काल ३१ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता ( कॅनडाच्या प्रमाणवेळेनुसार) अंतिम श्वास घेतला. दुपारी ते कोमात गेलेत आणि संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गत १६ ते १७ आठवड्यांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरु होते. आमचे अख्खे कुटुंब कॅनडात आहे. त्यामुळेच त्यांच्या पार्थिवावर कॅनडातचं अंत्यसंस्कार होतील.कादर खान हे प्रोग्रेसिव्ह सुप्रान्यूक्लीयर पाल्सीया आजाराने ग्रस्त होते. यामुळे त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केले होते. २२ आॅक्टोबर १९३७ रोजी जन्मलेल्या कादर यांनी १९७३ मध्ये ‘दाग’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्द सुरु केली होती. यात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते. यापूर्वी रणधीर कपूरव जया बच्चन यांच्या ‘जवानी दिवानी’ या चित्रपटासाठी कादर खान यांनी संवाद लेखन केले होते. मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासोबत त्यांनी अनेक पटकथा लिहिल्या.मनमोहन देसाई यांच्यासोबत मिळून कादर खान यांनी धर्मवीर, गंगा जमुनी सरस्वती, कुली, देशप्रेमी, सुहाग, अमर अकबर अँथोनी आदी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. तर मेहरा यांच्यासोबत मिळून ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर अशा अनेक चित्रपटांच्या पटकथांचे लेखन केले. त्यामुळे अभिनेता, संवाद लेखक शिवाय पटकथा लेखक अशी कादर खान यांची ओळख होती.कादर खान यांनी सुमारे ३०० चित्रपटांत काम केले आणि २५० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संवादलेखन केले.

Related Articles

Close